कोल्हापूर : इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेच्या १६१ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता | पुढारी

कोल्हापूर : इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेच्या १६१ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरासाठीचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या सुळकूड पाणी योजनेस नगर विकास विभागाने गुरुवारी प्रशासकीय मंजुरी दिली. या योजनेकरीता १६० कोटी ८४ लाख रूपये प्रस्तावित खर्च आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता. येत्या महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशा सूचना खासदार माने यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिल्या आहेत.

सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी वाढली

लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. त्याची आज पूर्तता झाल्याचा दावा खासदार माने यांनी केला आहे. आता योजना पूर्णत्वास नेऊन शहरास पाणी देण्याची जबाबदारी स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button