जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांच्या कमल जिनिंगमधून चोरट्यांनी जिनिंगची बाजूची भिंत फोडत चोरट्यांनी भिंतीच्या बोगद्यातून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने जिनिंग मालकाला साडेआठ लाखांचा फटका बसला आहे.

शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग असून चोरट्यांनी शनिवार, दि.29 रात्री जिनिंगची बाजूची भिंत चोरट्यांनी फोडत आत प्रवेश केला. त्यानंतर फोडलेल्या भिंतीच्या बोगद्यातून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला. कपाशीला आठ हजार रुपये भाव असल्यामुळे तिची किंमत साधारण चार लाखांच्या घरात आहे. तर मका ५० हजार रुपये असा साधारण साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या चाकांचे निशाणी दिसल्याने चोरट्यांनी वाहनातून माल लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी, दि.30 सकाळी नेहमी प्रमाणे मजूर कामावर आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अमोल गुंजाळ आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झाले.

हेही वाचा:

Back to top button