Kangana Ranaut : बॉक्स ऑफिसवर ‘धाकड’ का फ्लॉप झाला?; कंगनाने दिले उत्तर… | पुढारी

Kangana Ranaut : बॉक्स ऑफिसवर 'धाकड' का फ्लॉप झाला?; कंगनाने दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची क्वीन कंगणा राणावत ( Kangana Ranaut ) आपले बिनधास्त मत मांडताना आणि वादग्रस्त विधानांमुळे सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. कंगनाने तिच्या करिअरमध्ये एकाहून एक उत्तम चित्रपटातून अभिनयाची छाप सोडली आहे. परंतु, कंगनाचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. काही महिन्यापुर्वी रिलीज झालेला ‘धाकड’ ही फ्लॉप झाला होता. यानंतर आता कंगनाने बॉलिवूडमधील चित्रपट का फ्लॉप होत आहेत?, तिचा ‘धाकड’ का फ्लॉप झाला? याबद्दल खुलासा केला आहे.

कंगना राणावत ( Kangana Ranaut ) एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, ‘बॉलिवूड आपल्या भारतीय संस्कृतीपासून दूर गेले असून त्याची जागा साऊथच्या चित्रपटांनी घेतली आहे. साऊथचे चित्रपट बनवण्याच्या ट्रेंडमुळे चाहत्यांच्या क्रेझ वाढली आणि त्याच चित्रपटाकडे कलदेखील वाढू लागला. या सगळ्यामुळे बॉलिवूड मात्र मागे राहिले आणि चित्रपट फारकाळ बॉक्स ऑफिसवर टिकू शकली नाहीत. याच दरम्यान माझा स्वत: चा देखील ‘धाकड’ हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे ती म्हणाली.

धाकडमध्‍ये होते काही वेस्टर्न सीन

यापुढे धाकड चित्रपटाबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, ‘धाकड’ चित्रपटाचे अपयश मी मान्य केले आहे. कारण, या चित्रपटात काही वेस्टर्न सीन होते. यामुळे हा चित्रपट फार काळ बॉक्स ऑफिसवर चालला नाही. तुम्ही हिट चित्रपटाची यादी पाहिले तर त्या सर्वांची पाळेमुळे भारतीय संस्कृतीशी जोडली गेली आहेत. याच दरम्यान तिने ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ आणि मणिरत्नम यांचा ‘पोनियिन सेल्वम १’ यासारख्या हिट चित्रपट संस्कृतीशी संबंधित असल्याने आवडतात असेही सांगितले आहे. तसेच तिने या मुलाखतीत चित्रपटांच्या कामगिरीबद्दल अनेक प्रकारचे विश्लेषण केले आहे.

कंगना राणावतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती सध्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट पुढील वर्षी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगना ‘इंदिरा गांधी’ ची भूमिका साकारणार आहे. याशिवाय कंगनाकडे ‘तेजस’ हा चित्रपटात आहे. या चित्रपटात ती भारतीय हवाई दलाच्या पायलटची भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Back to top button