Harveen Kahlon : हॅटस ऑफ हरवीन..! हुतात्‍मा पतीचे स्‍वप्‍न साकारलं... | पुढारी

Harveen Kahlon : हॅटस ऑफ हरवीन..! हुतात्‍मा पतीचे स्‍वप्‍न साकारलं...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शत्रूशी लढताना पतीने देशासाठी प्राणाहुती दिली. 129 SATA रेजीमेंटमध्‍ये ते मेजर पदावर कार्यरत होते. एका क्षणात हरवीन कौर-काहलों ( Harveen Kahlon)  यांचे जीवन बदललं. पदरात लहान मुलगा आणि अन्‍य तारुण्‍यात पतीची सुटलेली साथ. त्‍यांच्‍यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र ‘धैर्य’ नावाच्‍या शस्‍त्राने त्‍यांनी डोंगराएवढ्या दु:खाला पार केले. पतीने देशासाठी बलिदान दिले. आपणही पतीच्‍या मार्गानेच वाटचाल करण्‍याचा निर्धार त्‍यांनी केला. आता चेन्‍नईत ११ महिन्‍यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन  हरवीन भारतीय सैन्‍यदलात अधिकारी म्‍हणून रुजू झाल्‍या आहेत.

मी माझ्‍या पतीचे स्‍वप्‍न साकारले

हरवीन या जालंधरमधील एका खासगी शाळेत शिक्षिका होत्‍या. मेजर कंवलपाल सिंह कहलों यांच्‍याशी त्‍यांचा विवाह झाला. 129 SATA रेजीमेंटमध्‍ये असणारे पती कंवपाल हे कर्तव्‍य बजावत असताना शहीद झाले. माझ्‍या पतीने नेहमीच मला भारतीय सैन्‍यदलात सेवा करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले होते. त्‍यांचे स्‍वप्‍न साकारण्‍यासाठी मी भारतीय सैन्‍यदलात अधिकारी झाले आहे, अशी प्रतिक्रिया हरवीन यांनी दिली.

हरवीन यांनी चेन्‍नईत ११ महिन्‍यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. माझ्‍या पतीने जी वर्दी घालून देशाची सेवा केली तीच वर्दी परीधान करुन मी देशाच्‍या सेवेसाठी सज्‍ज झाले असल्‍याचेही हरवीन यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button