अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्‍यक्‍तीला ठार मारले | पुढारी

अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्‍यक्‍तीला ठार मारले

वॉशिंग्‍टन ; पुढारी ऑनलाईन : काबूल विमानतळावर झालेल्‍या आत्‍मघाती हल्‍यात अमेरिकेचे १३ सैनिक ठार झाले होते. या हल्‍याचा बदला घेण्‍यात येईल, असा इशारा अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांनी दिला होता. यानंतर काही तासांमध्‍ये काबूलमध्‍ये अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्‍यक्‍तीला ठार मारले आहे. काबूलमध्‍ये अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्‍यक्‍तीला ठार मारले असल्‍याने यावर आता काेणती कारवाई करणार असा सवाल केला जात आहेत.

यासंदर्भात न्‍यूयॉर्क टाइम्‍सने दिलेल्‍या वृत्तानुसार, अमेरिकेने २९ ऑगस्‍ट रोजी अफगाणिस्‍तानमध्‍ये केलेल्‍या हवाई हल्‍लयात ‘इसिस-के’ या दहशतवादी संघटनेच्‍या दशतवाद्‍याऐवजी आपल्‍याच सहायता समूहातील निर्दोष व्‍यक्‍तीला ठार मारले.

काबूल विमानतळावर झालेल्‍या आत्‍मघाती हल्‍ल्‍यात २०० जणांसह १३ अमेरिकन सैनिकही ठार झाले होते.

यानंतर २९ ऑगस्‍ट रोजी अमेरिकेने हवाई हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात ‘इसिस-के’चा दहशतवादी ठार झाला असल्‍याचे अमेरिकेने जाहीर केले होते.

दहशतवादी म्‍हणून ज्‍याला ठार केले ती व्‍यक्‍ती निर्दोष असल्‍याचे न्‍यूयाॅक टाइम्‍सने म्‍हटले आहे.

विशेष म्‍हणजे अमेरिकेच्‍या ड्राेन हल्‍ल्‍यात ठार झालेली व्‍यक्‍ती ही अमेरिकेच्‍या सहायता समूहामध्‍ये काम करत होती. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या कारवाईवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.

अमेरिकेने केलेल्‍या हल्‍यात सुमारे १० नागरिक ठार झाले. यामध्‍ये काही मुलांचाही समावेश आहे.

काबुलमधील रहिवासी आयमल अहमदी यांनी सांगितले की, २९ ऑगस्‍ट रोजी झालेल्‍या हल्‍ल्‍यात त्‍यांच्‍या भावासह पुतणा आणि पुतणी ठार झाले होते.

सुरक्षा कॅमेर्‍याचे विश्‍लेषण करत एजामाराई अहमदी यांच्‍यावर दहशतवादी समजून हल्‍ला करण्‍यात आल्‍याचे  न्‍यूयॉर्क टाइम्‍सने म्‍हटलं आहे.

त्‍यांच्‍या नातेवाईकांनी सांगितले की, एजमाराई अहमदी हे इलेक्‍ट्रिकल इंजीनिअर म्‍हणून  काम करत होते. २९ ऑगस्‍ट रोजी दहशतवादांवर ड्रोन हल्‍ला करण्‍यात आला. यामध्‍ये त्‍यांचा मृत्‍यू झाला.

अमेरिकेच्‍या अधिकार्‍यांनी याबाबत खुलासा करताना म्‍हटले आहे की, ड्रोन हल्‍ला झाल्‍यानंतर काराचा स्‍फोट झाला.

कारमध्‍ये स्‍फोटके असल्‍यामुळेच हल्‍ल्‍यानंतर कारमध्‍ये स्‍फोट झाला. तर न्‍यूयॉर्क टाइम्‍सने म्‍हटले आहे की, कारमध्‍ये स्‍फोटके असल्‍यासंदर्भातील कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

हेही वाचलं का? 

Back to top button