उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर भूकंपाने हादरला | पुढारी

उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर भूकंपाने हादरला

डेहराडून; पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर आज सकाळी भूकंपाच्‍या धक्‍क्‍याने हादरला. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्‍टर स्‍केल इतकी नोंदवली गेली आहे, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्‍मोलॉजीने दिली.  भूकंपाचे केंद्र हे उत्तराखंडमधील जोशीमठ परिसर पासून  ३१ किलोमीटर अंतरावर होते.

पहाटे ५ वाजून ५८ मिनिटांनी बसलेल्‍या भूकंपाचे झटके जाणवले. भयभीत नागरिक घराबाहेर पडले.

या भूकंपामुळे कोणताही जिवित वा वित्तहानी झालेली नाही.

मात्र मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे झटके जाणवल्‍याने नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राष्‍ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्‍प

उत्तराखंडमध्‍ये गुरुवारी रात्री मुसळधार पावसासह काही ठिकाणी ढगफूटी झाली.

यामुळे ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावर भूस्‍खलन झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्‍याने राष्‍ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्‍प झाली आहे.

महामार्गावर वाहनांच्‍या रांगा लागल्‍या आहेत. रुद्रप्रयाग जिल्‍ह्यातील सिरोबगडमध्‍ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले.

जिल्‍ह्यातील अनेक मार्गांवर दरड कोसळण्‍याच्‍या घटना घडल्‍याने प्रशासनाने वाहतूक बेद केली आहे. जिल्‍ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावासामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यावर्षी उत्तराखंडमध्‍ये पिथौरागढ आणि हिमाचलमधील किन्‍नौरमध्‍ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्‍के बसले होते. तसेच उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशमध्‍ये अनेक ठिकाणी भूस्‍खलनाच्‍या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्‍या आहेत.

सिमलामध्‍ये ऑगस्‍ट महिन्‍यात भूस्‍खलनाच्‍या मोठ्या घटना घडल्‍या. दरवर्षी पावसाळ्यात उत्तरखंडमध्‍ये दरडी कोसळण्‍याच्‍या घटना घडतात मात्र यावर्षी या घटनांमध्‍ये झालेली वाढ ही चिंता वाढविणारी असल्‍याचे भूभर्ग शास्‍त्रज्ञांनी म्‍हटले आहे.

पाहा व्‍हिडिओ : गणपतीची सुंदर वस्त्रे आणि आभूषणे तयार करणारा सातारचा अवलिया

Back to top button