कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट; ५ मशिदींमध्‍ये गणरायाची प्रतिष्‍ठापना | पुढारी

कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट; ५ मशिदींमध्‍ये गणरायाची प्रतिष्‍ठापना

कुरुंदवाड; जमीर पठाण : गणेशाेत्‍सव काळात कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट झाली आहे. शहरातील पाच मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना झाल्‍याने कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट झाली आहे.  या नगरीने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारी परंपरा अबाधित ठेवली आहे. मोहरम काळातही मशिदीत गणरायाची प्रतिष्‍ठापना केली जाते. यावेळी हिंदू-मुस्‍लिम बांधव एकत्र येउन उत्‍सव साजरा करतात.

 पाच मशीदीत पीर व गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना

येथील कुडेखान बडेनालसाहेब मशीद,­­ कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद, ढेपणपूर मशीद या पाच मशिदी मध्ये पारंपारिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

सन १९८२ मध्‍ये शहरातील पाच मशिदींमध्‍ये पीर व गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कै.गुलाब गरगरे, कै.दिलावर बारगीर, कै.वली पैलवान, कै.नरसू कुरणे, कै.विठ्ठल चोरगे, विलास निटवे, महादेव माळी,आप्पासाहेब भोसले, शंकर पाटील, बापूसाहेब आसंगे, तानाजी आलासे, महावीर आवळे यांच्यासह आदी मंडळींनी सुरु केली.

मुस्‍लिम समाजाकडून गणपतीची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवाच्या काळात मुस्‍लिम समाजाकडून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे गणपतीची पूजाअर्चा केली जाते.

36 वर्षानंतर सन 2018 सालापासून पुन्हा एकदा गणपती आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित साजरा करण्याची पर्वणी आली होती.

2020 सालापर्यंत 3 वर्षे मशिदीत पीर आणि गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करून समस्त हिंदू,  मुस्लिम समाज बांधवांनी  भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले.

पाच मशिदीत गणपतीची “गणपती बाप्पा मोरया”,”या हुसेन धैवल्याच्या” जयघोषात मोहरम सणातील मानाचा वाद्य ढोलताशाच्या गजरात मिरवणुकीने गणेशमूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली.

कुरुंदवाड शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारं शहर आहे.

हे मोहरमात हिंदू बांधव पिराला मोदकांचा नैवद्य दाखवून तर गणेशोत्सवामध्ये गणपतीला मुस्लीम समाजबांधव रोठांचा व मलिद्याचा नैवैद्य दाखवून भक्तिभावाने या उत्‍सवात सहभाग नोंदवून सण साजरा करत असतात.

खाई अग्निकुंड उधळण्यात हिंदू समाज बांधवांची संख्या अधिक 

मोहरमच्या सातवी, आठवी, दहावी दिवशीच्या भेटीसाठी पिर धरण्याचा बहुतांश मान हिंदू समाजातील युवक पार पाडत असतात.

नव्या खत्तल रात्रीच्या दिवशी खाई अग्निकुंड उधळण्यात हिंदू समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

राज्यात अनेक वेळा जातीय दंगली उसळल्या असताना मात्र त्याचा शहरातील हिंदू मुस्लीम ऐक्यावर कधीच परिणाम झाला नाही.

कुरुंदवाडकरांनी शहरातील मशिदीतील गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनीही घ्यावा असा संदेश दिला होता.

कुरुंदवाड या ऐतिहासिक नगरीत सर्वधर्मीयांची एकात्मतेची विन आजही घट्ट आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button