फटाके बंदीला आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली | पुढारी

फटाके बंदीला आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -देशाची राजधानी दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने घातलेल्या फटाके बंदीला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. फटाका बंदीसंदर्भातील बऱ्याच याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यामुळे या विषयावर आम्ही निर्णय देऊ इच्छित नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

दिल्ली सरकारने येत्या 1 जानेवारी 2023 पर्यंत फटाके फोडण्यास, त्याची विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातलेली आहे. हवेच्या वाढत्या प्रदुषणाचे कारण यासाठी दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिलेले आहे. फटाके बंदीच्या या निर्णयाला आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तथापि सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी नकार दिला.

हेही वाचा : 

 

Back to top button