T20 World Cup IND vs PAK सामन्‍यापूर्वी बाबर आझमने घेतल्‍या गावस्‍करांकडून फलंदाजीच्‍या टिप्‍स

T20 World Cup IND vs PAK सामन्‍यापूर्वी बाबर आझमने घेतल्‍या गावस्‍करांकडून फलंदाजीच्‍या टिप्‍स

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारत आणि पाकिस्‍तान हे संघ रविवारी ( दि. २३) आमने-सामने येतील. मागील वर्षी झालेल्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत पाकिस्‍तानने भारताचा पराभव केला होता. आता याची परतफेड करण्‍यासाठी रविवारी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्‍यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर बाबर आझम याने भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्‍कर यांची भेट घेतली. या भेटीचा व्‍हिडीओ पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डने आपल्‍या अधिकृत ट्विटरवरुन शेअर केला आहे. ( T20 World Cup IND vs PAK )

या व्‍हिडीओमध्‍ये बाबर याच्‍याबरोबर पाकिस्‍तान संघाचे प्रशिक्षक सकलैन मुश्‍ताक आणि फलंदाजीचे प्रशिक्षक मोहम्‍मद यूसुफ दिसत आहेत. एका खासगी कार्यक्रमावेळी बाबर आणि गावस्‍कर यांची भेट झाली. यावेळी बाबर याने कॅपवर सुनील गावस्‍कर यांची ऑटोग्राफही घेतली.

T20 World Cup IND vs PAK : गावस्‍करांकडून फलंदाजीच्‍या टिप्‍स

यावेळी सुनील गावस्‍कर यांनी बाबर आझमला फलंदाजीसाठी काही टिप्‍सही दिल्‍या. गावस्‍कर म्‍हणाले, "फलंदाजी करताना योग्‍य फटका मारणे खूपच महत्त्‍वाचे असते. फलंदाजाने नेहमी परिस्‍थितीनुसार फटका कसा मारावा हे ठरवले तर कोणतीही अडचण येत नाही."
यावेळी गावस्‍कर यांनी मोहम्‍मद युसूफ याला त्‍याने एक वर्षात कसोटीमध्‍ये १८०० धावा केल्‍याच्‍या विक्रमाची आठवणही करुन दिली. २००६ मध्‍ये युसूफ याने ११ कसोटी सामन्‍यांमध्‍ये १९ डाव्‍यांत १ हजार ७८८ धावा केल्‍या होत्‍या. त्‍याने ९ शतके झळकावली होती. या वर्षी युसूफच्‍या कसोटीमधील सरासरी धावा ९९.३३ होत्‍या. तर त्‍याची सर्वोत्‍कृष्‍ट खेळी २०२ धावांची होती. यावर्षी यूसुफ याला तीनवेळा मालिकावीर म्‍हणून गौरविण्‍यात आले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news