Gold prices Today | धनत्रयोदशीला सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर | पुढारी

Gold prices Today | धनत्रयोदशीला सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Gold prices Today : धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस (Dhanteras). धनत्रयोदशी दिवशी सोने- चांदीची खरेदी केली जाते. यंदा धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे. कारण सोने-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असून देशातील सराफा बाजारातही सोन्याचे दर उतरण्याची शक्यता आहे. आज गुरुवार (दि.२०) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,२४७ रुपयांवर खुला झाला असल्याची माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिली आहे.
आज गुरुवारी २३ कॅरेट सोने ५०,०४६ रुपये, २२ कॅरेट ४६,०२६ रुपये, १८ कॅरेट ३७,६८५ रुपये, १४ कॅरेट सोन्याचा भाव २९,३९५ रुपये होता. दर चांदीचा दर प्रति किलो ५५,७७८ रुपयांवर खुला झाला आहे.

अमेरिकेच्या फेडरर रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदरवाढीची शक्यता आणि डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. हा दर तीन आठवड्याच्या निचांकी पातळीवर आला आहे. स्पॉट गोल्डचा दर ०१ टक्क्याने घसरून प्रति औंस १,६२७ डॉलरवर आला आहे. हा २६ सप्टेंबर नंतरचा निचांकी दर आहे. या दिवशी सोने प्रति औंस १,६२४ डॉलरवर घसरले होते. (Gold prices Today)

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मुल्य, जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पुरवठा साखळीतील अडचणी आदी अनेक घटकांवर सोन्याचे दर अवलंबून असतात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. मार्च २०२२ मध्ये सोन्याचा भाव ५५ हजारांवर गेला होता. आता हा भाव ५० हजारांवर आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button