बारामती : ओढ्याच्या पुरात दुचाकीसह युवक गेला वाहून, अद्याप शोध लागला नाही | पुढारी

बारामती : ओढ्याच्या पुरात दुचाकीसह युवक गेला वाहून, अद्याप शोध लागला नाही

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी (दि. २०) रात्री अडीचच्या सुमारास मुर्टी येथील ओढ्याला आलेल्या पुरात एक युवक दुचाकीसह वाहून गेला. त्याच्याकडे डिलक्स गाडी होती, तर डोक्यात हेल्मेट घालण्यात आले होते, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. मुर्टी-मोरगाव रस्त्यावर सानिका हाॅटेल जवळील ओढ्याला आलेल्या पुरात हा युवक मोटारसायकलसह वाहून गेला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परंतु अद्याप शोध लागलेला नाही.

त्याचे नावही अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुरात वाहून गेलेल्या युवकाच्या डोक्यावर हेल्मेट होते. तसेच अंगात जर्किन व पाठीमागे सॅक अडकवलेली होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सानिका हाॅटेलचे मॅनेजर इब्राहीम बागवान यांनी ही घटना प्रत्यक्षा पाहत पोलिसांना कल्पना दिली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे व सहकारी रात्रीच तेथे पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य केले जात आहे.

Back to top button