उरुळी कांचन ला पुरात तरुण वाहून गेला ; दुचाकी आढळली | पुढारी

उरुळी कांचन ला पुरात तरुण वाहून गेला ; दुचाकी आढळली

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा: वळती , शिंदवणे घाटात मंगळवारी (दि.१८) झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने उरुळी कांचन शहरात रात्री आलेल्या महापूराने एका तरुण वाहून गेल्याची घटना उघडकीस आली असून घटनास्थळावरून तरुणाची अडकलेली दुचाकी आढळली आहे. महापुरात तरुण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात असून रात्री नऊ वाजल्यापासून त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाने शोध मोहिम सुरू केली आहे.

प्रशांत चांगदेव डोंबाळे (वय -३७, रा. दातार कॉलनी , उरुळी कांचन ) असे या तरूणाचे नाव आहे. तो उरुळी कांचन भवरापूर मार्गाने तुटका महादेव मार्गाने ओढ्यावरील कच्च्या पुलावरुन उरुळी कांचन दिशेने चालला होता. मात्र ओढ्यातील पुराचा अंदाज न आल्याने तो पुरात पडला असुन त्याची दुचाकी मोटरसायकल घटनास्थळी पुलाच्या नळीतून बाहेर काढण्यात आली आहे. परंतु रात्री ९ पासून त्याचा संपर्क होत नसल्याने डोंबाळे वाहून गेल्याची शक्यता आहे.

मंगळवारी रात्री सायंकाळी ५ नंतर वळती व शिंदवणे घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः धुमाकुळ घात ला आहे. या पावसाचा पूराचा लोट रात्री ८ नंतर उरुळी कांचन ओढ्यावर पडला आहे. ओढ्यात प्रचंड पूराचा लोट आल्याने उरुळी कांचन शहरातील उत्तर भागाला जोडणाऱ्या वाहतुक रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. परंतु या तरुणाने घरी पोहचण्यासाठी पर्यायी रस्ताचा वापर केल्याने हा प्रसंग घडला आहे.

दरम्यान उरुळी कांचन शहरात पूर उद्भवण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्याची पूर्वकल्पना स्थानिकांना संदेशाद्ववारे देण्यात आली होती. परंतु तरुण वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रसंग घडला. पूरात कोणीतरी वाहून गेल्याचा प्रकार या परिसरात प्रथमच घडला आहे. उरुळी कांचन शहरावर पूरपरिस्थिती येणार म्हणून रात्रभर ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी घेतली होती. जेसीबी मशीन , ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन पूराचा प्रवाह वाट करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन,भवरापूर तंटामुक्ती हनुमंत टिळेकर यांनी दुचाकी वाहन बाहेर काढण्यास यंत्रणा लावली होती.

Back to top button