नगर :  एसटीची शुक्रवारपासून भाडेवाढ ; गोरगरिबांना आर्थिक फटका | पुढारी

नगर :  एसटीची शुक्रवारपासून भाडेवाढ ; गोरगरिबांना आर्थिक फटका

नगर :  पुढारी वृत्तसेवा : दिवाळीत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने 21 ते 31 ऑक्टोबर या अकरा दिवसांसाठी 10 टक्के भाडेवाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून मात्र, पूर्ववत भाडे आकारले जाणार आहे. या भाडेवाढीचा गोरगरिब जनतेला मात्र, आर्थिक फटका बसणार आहे. दिवाळी म्हटले की, एसटी महामंडळाची आर्थिक चांदी हे समीकरण झाले आहे. दिवाळी, पाडवा व भाऊबीज या सणामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची महामंडळाच्या बसला मोठी गर्दीॅ असते.

या गर्दीचा आर्थिक फायदा उठविण्यासाठी महामंडळाने 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या अकरा दिवसांसाठी भाडेवाढीचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील साधी व जलद बससाठी 9.70 पैसे, निमआराम, वातानुकूलित शिवाई (आसनी) व साधी शयनआसणी बससाठी 13 रुपये तर वातानुकूलित शिवशाही (आसनी) बससाठी 13.60 रुपये प्रति टप्पा भाडे आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनतेने दिवाळी सुटीत सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसव्दारेच प्रवास करुन सहकार्य करावे, असे आवाहन अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.

नगर येथून सुटणार्‍या बसचे तिकिट
गावे  साधी निम आराम शिवशाही शिवनेरी साधी शयनयान
पुणे  195 260 285 390 260

मुंबई  450 615 670 910 615

कल्याण  335 460 500 680 460

कोल्हापूर  575 785 855 1165 785

पंढरपूर  325 445 485 660 445

नाशिक  280 380 415 565 380

औरंगाबाद  185 250 275 370 250

शेवगाव  105 145 160 215 145

जामखेड  125 170 185 255 170

श्रीरामपूर  115 160 175 235 160

कोपरगाव  165 225 245 330 225

पारनेर  70 90 100 135 90

संगमनेर 165 225 245 330 225

श्रीगोंदा  105 145 160 215 145

नेवासा  95 130 145 195 130

पाथर्डी  85 120 130 175 120

अकोले  205 275 300 410 275

 

 

 

Back to top button