रायगड: चिरनेर येथे ड्रोनद्वारे आंबा झाडांवर फवारणी | पुढारी

रायगड: चिरनेर येथे ड्रोनद्वारे आंबा झाडांवर फवारणी

उरण (रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : उरण तालुक्यातील चिरनेर येथे ड्रोनद्वारे झाडांना फवारणी कशी करावी, याचे प्रात्याक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले. कृषी विभाग उरण तालुका व माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती बारामती, गरूडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रात्याक्षिकाचे आयोजन केले होते. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर यांच्या शेतीपासून प्रात्याक्षिकाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती चे पीआरओ अधिकारी महेंद्र किरनापुरे यांनी मार्गदर्शन केले. ड्रोन फवारणी केल्यावर काय काय फायदे होणार, पिकावर लागणारी किड कशी आटोक्यात आणता येईल, याविषयी त्‍यांनी सांगितले.

ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्याला शासनातर्फे अनुदान देण्यात येणार असल्याचे महेंद्र किरनापुरे यांनी सांगितले. यामध्ये साधारण शेतकरी 40 टक्के, बी एस सी, अग्री 50 टक्के, सोसायटी, आत्मा गट 60 टक्के, एफपीओ कंपनी 75 टक्के, आणि केवीके 100 टक्के असे अनुदान असणार आहे. या प्रात्याक्षिकात जवळजवळ 400 आंब्याच्या झाडांना बुरशीनाशक आणि किटकनाशकांची फवारणी करण्यात आली.

यावेळी चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ ढवळ, कृषि सहाय्यक निखिल देशमुख, आर.पी. भजनावले, पी.एल थडके, सुषमा आंबुलकगेकर, सुरज घरत, कविता ठाकूर, कृषिमित्र प्रफुल खारपाटील, संदेश चिर्लेकर, भास्कर ठाकूर, रमेश गोंधळी, कृष्णा म्हात्रे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button