China Border : चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशमधील दोन तरुण बेपत्ता | पुढारी

China Border : चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशमधील दोन तरुण बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : वैद्यकीय वनस्पतींच्या शोधात बाहेर पडलेले अरुणाचल प्रदेश राज्‍यातील  दोन तरुण गेल्या ५६ दिवसांपासून  बेपत्ता आहेत.  बेटिलम टिकरो आणि बेइंग्सो मन्यु  त्‍यांनी नावे आहेत. दोघांना चिनी (China Border) सैनिकांनी ओलिस ठेवल्याचा संशय त्यांच्या कुटूंबियांनी व्‍यक्‍त केला आहे.

माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश  बेटिलम टिकरो आणि बेइंग्सो मन्युमधील तरुण जिल्ह्यातील गोइलांग शहरातील रहिवासी आहेत. ते दोघे चगलगाम येथे वैद्यकीय वनस्पतींच्या शोधासाठी १९ ऑगस्ट रोजी  बाहेर पडलेले होते. गेले दोन महिना ते दोघे बेपत्ता आहेत. ते २४ ऑगस्टला गावकऱ्यांना दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या बाबतीत कोेणतीही माहिती त्यांच्या कुटूंबियांना मिळालेली नाही. चगलगाम येथे जाण्यासाठी निघालेले हे दोघे अद्याप तिथे पोहचलेले नाहीत.

गेले दोन महिना बेपत्ता

बेटिलम टिकरो आणि बेइंग्सो मन्यु  हे गेले दोन महिना बेपत्ता आहेत.  त्यांच्या घरच्यांनी शोेध घेतला; पण त्यांच्याबाबतीत कोणतीही माहीती मिळाली नाही. त्यानंतर त्यांच्या  कुटुंबियानी दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. कुटुंबियानी केंद्र, राज्य सरकार आणि लष्कराकडे मदतीची मागणी केली आहे.

China Border : चिनी सैनिकांनी ओलिस ठेवल्याचा संशय

बेटिलम टिकरोच्या कुटूंबातील एका सदस्याच्या मते हे दोघे चुकून चीन सीमेजवळ गेले असावेत. त्यांना ओलिस ठेवल्याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. बेपत्ता तरुण भारतीय सीमेजवळच असावेत, असा अंदाज अंजवचे एसपी रायके कामसी यांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button