IND vs PAK : आयसीसीने निवडली भारताची संभावित प्लेइंग XI, पाक विरुद्धच्या सामन्यात शमीला डच्चू | पुढारी

IND vs PAK : आयसीसीने निवडली भारताची संभावित प्लेइंग XI, पाक विरुद्धच्या सामन्यात शमीला डच्चू

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मेगा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत असून आयसीसीने सर्व संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, आयसीसीने या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन आणि ऋषभ पंत यांचा समावेश केलेला नाही. तर अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल या दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. तसेच, आयसीसीने पंतऐवजी दिनेश कार्तिकला पसंती दिली आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणर आहे. (IND vs PAK T20 World Cup icc predicts team india probable playing xi for match against pakistan rishabh pant mohammed shami r ashwin out)

आयसीसीने निवडलेल्या भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. आयसीसीने सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकला स्थान दिले आहे. भारताचा हा फलंदाजीचा क्रम जवळपास निश्चित झाला आहे. पण गोलंदाजीसाठी निवड अडकली आहे.

जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आपले गोलंदाजी आक्रमण कसे मजबूत करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल हे दोन फिरकीपटू आयसीसीच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत, तर त्यांनी भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांचा वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश केला आहे. (IND vs PAK T20 World Cup icc predicts team india probable playing xi for match against pakistan rishabh pant mohammed shami r ashwin out)

मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि आर अश्विन व्यतिरिक्त दीपक हुडाचा पहिल्या सामन्याच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये ICC ने समावेश केलेला नाही.

आयसीसीने निवडलेली भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

Back to top button