भंडारा : धक्कादायक! पती-पत्नीची गळा चिरून हत्या | पुढारी

भंडारा : धक्कादायक! पती-पत्नीची गळा चिरून हत्या

भंडारा पुढारी वृत्तसेवा :  पती-पत्नीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही रोड सितासावांगी  येथे घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असावी असा अंदाज आहे.

पती-पत्नीची गळा चिरून हत्या

माहितीनुसार, सुशील बोरकर व सरिता बोरकर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. त्यांना दोन मुले आहेत. गुरुवारी रात्री पती पत्नी एका खोलीत तर मुले दुसऱ्या खोलीत झोपी गेले होते. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास मुले जागी झाली. त्यांनी आई वडिलांना आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना  बोलाविले. त्यांनी येऊन आवाज दिला. परंतु कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी दोघेही पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.
पत्नी बिछान्यावर तर पती खाली गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आले. लागलीच गोबरवाही पोलिसांना सूचना देण्यात आली. घटना स्थळी पोलिस अधीक्षक लोहित मतानी व अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. या दोघांचं खून नेमका कुणी व कसा झाला, याचा तपास सुरू आहे.
मृत सुशील हा अंडी विक्रीचा व्यवसाय करायचा तर सरिता ही आशा सेविका म्हणून काम करत होती.
हेही वाचलंत का?

Back to top button