सांगली : खानापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब भगत यांच्यावर हल्ला | पुढारी

सांगली : खानापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब भगत यांच्यावर हल्ला

विटा, पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून खानापूर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब भगत यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मात्र ते यातून सुखरूप बचावले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.१३) सायंकाळी सातच्या सुमारास खानापूर येथे घडली. हा हल्ला जावेद मुबारक अतार याने केल्याचे विटा पोलिसांनी सांगितले. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवसेना खानापूर तालुका अध्यक्ष पांडुरंग आनंदराव भगत हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खानापूर येथील नगरपंचायतीच्या समोर थांबले असताना जावेद अतार हा तिथे आला आणि आमची घेतलेली जमीन आम्हाला परत देऊन टाक असे म्हणून त्याने हल्ला केला. अचानक झालेला हा हल्ला भगत यांनी आपला डावा हात पुढे करून अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र चाललेला आरडाओरडा ऐकून घटनास्थळी गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जावेद याने तेथून पळ काढला. उपस्थित लोकांनी तात्काळ पांडुरंग भगत त्यांना भिवघाट करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. सध्या ते ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. दरम्यान या घटनेची विटा पोलिसांमध्ये नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार भगत आणि अतार यांच्यात जमिनी संदर्भात वाद आहे, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button