Good News! : प्राणीप्रेमींसाठी आनंददायी बातमी, आकासा एअरची पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन प्रवास करण्याची परवानगी | पुढारी

Good News! : प्राणीप्रेमींसाठी आनंददायी बातमी, आकासा एअरची पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन प्रवास करण्याची परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Good News : आकासा एअर विमानसेवा कंपनीने १ नोव्हेंबर पासून आपल्या विमानांतून कुत्रे आणि मांजर या पाळीव प्राण्यांना नेण्याची परवानगी दिली आहे. प्रवाशांना विमानाच्या केबिन आणि कार्गोमधून पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार आहे. आकासा एअर ही पाळीव प्राण्यांना उड्डाणांमध्ये परवानगी देणारी दुसरी विमान कंपनी ठरली आहे.

आकासा एअरची स्थापना राकेश झुनझुनवाला आणि विनय दुबे यांनी केली. नवी दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगळूरू, कोची यासह अनेक शहरांमध्ये विमानसेवा देणाऱ्या आकासा एअर कंपनीने ७ ऑगस्टला आकाशात भरारी घेतली. सध्या कंपनीकडे सहा विमानांचा ताफा असून पुढील वर्षी मार्चपर्यंत ही संख्या १८ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विमानसेवा सुरू झाल्यापासून ६० दिवसांतील कामगिरीनंतर कंपनीने आता कुत्रे आणि मांजरी या पाळीव प्राण्यांना घेऊन प्रवाशांना विमान प्रवास करण्याची (Good News) परवानगी दिली आहे. १ नोव्हेंबरपासून प्रवाशांना आता त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत केबिनमध्ये प्रवास करता येणार आहे.

आतापर्यंत फक्त एअर इंडियाने आरोग्य आणि रेबीज लसीकरण प्रमाणपत्रांसह कुत्रे, मांजर आणि पक्षी यांसारख्या लहान निरुपद्रवी पाळीव प्राण्यांना उड्डाण करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे आकासा एअर ही पाळीव प्राण्यांना उड्डाणांमध्ये (Good News ) परवानगी देणारी दुसरी विमान कंपनी ठरली आहे. आकासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ७ किलो वजनाच्या पाळीव प्राण्यांना विमानात परवानगी दिली जाईल. प्रत्येक पाळीव प्राणी पिंजऱ्यात असणे बंधनकारक असेल. पाळीव प्राण्यांच्या प्रवासासाठी शुल्क आकारले जाणार असून ते लवकरच जाहीर केले जाईल.

हेही वाचा :

Back to top button