सेवा क्षेत्राचा निर्देशांक सहा महिन्यांच्या निचांकी स्तरावर | पुढारी

सेवा क्षेत्राचा निर्देशांक सहा महिन्यांच्या निचांकी स्तरावर

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा – जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये येत असलेल्या मंदीचा परिणाम भारतावरही दिसू लागला असून सरत्या सप्टेंबर महिन्यात सेवाक्षेत्राची घौडदौड काही प्रमाणात कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक 57.2 टक्क्यांच्या तुलनेत 54.3 टक्के इतका नोंदवला गेला आहे. सेवा पीएमआय निर्देशांकाचा हा गेल्या सहा महिन्यांचा निचांकी स्तर आहे.

एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेसकडून पीएमआय निर्देशांकाचे आकडे जारी केले जातात. सेवा क्षेत्राच्या उलाढालीचा आढावा घेऊन हा निर्देशांक जारी केला जातो. सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक सहा महिन्यांच्या निचांकी स्तरावर आला असला तरी गेल्या चौदा महिन्यांपासून तो 50 च्या वर राहिलेला आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. हा निर्देशांक 50 च्या खाली आला तर सेवा क्षेत्राची घसरण सुरु झाली, असे मानले जाते.

कोरोना संकटादरम्यान सेवा क्षेत्र गडगडले होते; पण गेल्या दीड वर्षात हे क्षेत्र बऱ्यापैकी सावरले आहे. सप्टेंबरमध्ये पीएमआय निर्देशांक खाली आला तरी सेवा क्षेत्र अजुनही मजबूत असल्याचे एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेसकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button