RBI Repo Rate : २० वर्ष मुदतीचे गृहकर्ज फेडण्‍यासाठी आता लागणार २४ वर्ष

RBI Repo Rate : २० वर्ष मुदतीचे गृहकर्ज फेडण्‍यासाठी आता लागणार २४ वर्ष
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सातत्याने रेपो दरात वाढ केलेली असल्याने गृहकर्ज आणि इतरही कर्जांचे व्याजदर वाढलेले आहेत. त्यामुळे साहजिकच EMIही वाढलेले आहेत. आताच्या प्रचलित व्याजदराचा विचार केला, तर तुम्ही जे कर्ज २० वर्षांच्या मुदतीसाठी घेतले होते, त्याची परतफेड करण्यासाठी आता २४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. २ ते ३ वर्षांपूर्वी ज्यांनी गृहकर्ज घेतले होते त्यांचे EMI वाढणार आहेत, त्यामुळे कर्ज परतफेड करण्याचा कालावधीही वाढणार आहे. Loan for 20 years, EMIs for 24

एप्रिलपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत ४ वेळा रेपो रेट वाढवले आहेत. त्यामुळे पूर्वी ज्या गृहकर्जांची मुदत २० वर्ष होती, ती आता २४ वर्षं झाली आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवलेल्या रेपो दरामुळे गृहकर्जावरील व्याजदर जवळपास १४० बेसिक पॉईंटनी वाढले आहे. यामध्ये अजून ५० बेसिक पॉईंटची भर पडणार आहे, असे इकॉनॉमिक टाईम्सने म्हटलं आहे.

समजा एखाद्या व्यक्तीने एप्रिल २०१९ मध्ये २० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाखांचे गृहकर्ज घेतले असेल तर त्या व्यक्तीला आता ६० मासिक हप्ते जादा भरावे लागणार आहेत. जर १० लाखाचे गृहकर्ज असेल तर EMI १२०० रुपयांनी वाढलेला असेल.
महागाईचा निर्देशांक ६.७ टक्के इतका राहाणार असल्याचा अंदाज असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका ही व्याजदरात वाढ करण्याची राहाणार आहे. तर अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हनेही व्याजदारात वाढ करण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news