वाशीम : मंगरुळपीर येथे भरदिवसा घरफोडी; साडे बारा लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

वाशीम : मंगरुळपीर येथे भरदिवसा घरफोडी; साडे बारा लाखांचा ऐवज लंपास

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : मंगरुळपीर शहरातील नवीन सोनखास येथील शिक्षिकेच्या घरी बुधवारी (दि. 5) रोजी भरदिवसा घरफोडी झाली. या घरफोडीत अंदाजे साडेबारा लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती विजय डवले (वय ५७, रा मंगरूळपीर जि. वाशिम) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले प्रमाणे ज्योती डवले या सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या घराला कुलूप लावून नोकरी करीता बालदेव येथे शाळेत गेल्या. सायंकाळी घरी परत आल्या असता घराचे दरवाजाचे लॉक तुटलेले दिसून आले. दाराची कडी बाहरून अर्धवट लावलेली दिसली. डवले या दार उघडून आत गेल्या, यावेळी रूममधील लोखंडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तपासल्यानंतर ते लंपास झाल्याचे लक्षात आले.

पुढील तपास वाशिमचे पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button