कराड : पुणे-बंगळूर महामार्ग रस्त्यालगत दुकानांना आग; लाखोंचे नुकसान | पुढारी

कराड : पुणे-बंगळूर महामार्ग रस्त्यालगत दुकानांना आग; लाखोंचे नुकसान

कराड, पुढारी वृत्तसेवा : मलकापूर  ( ता. कराड ) येथील पुणे-बंगळूर महामार्गाच्या रस्त्यालगत व कृष्णा हॉस्पिटलच्या भिंतीला लागून दुकानांना अचानक आग लागली. मंगळवारी (दि.4) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीची झळ आजूबाजूच्या अनेक दुकानांना बसली. आग नेमकी कशामुळे लागले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीमध्ये व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

काही नागरिकांनी कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन  दलाच्या जवानांनी आग विझवली. मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील बाजूस कृष्णा हॉस्पिटलचे मुख्य गेट ते ढेबेवाडी फाटा दरम्यान सेवा रस्त्यालगत अनेक व्यवसायिकांची दुकाने एकमेकांना लागून आहेत. यामध्ये स्टेशनरी, ज्यूस विक्री, हॉटेल, फळे विक्री यासह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा समावेश आहे.

एका दुकानातून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. त्यामुळे व्यावसायिकांसह परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या आगीने काही क्षणातच बाजूच्या अनेक दुकानांना वेढा दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Back to top button