Indian People Kidnapped : कॅलिफोर्नियात 8 महिन्यांच्या मुलीसह चार भारतीयांचे अपहरण | पुढारी

Indian People Kidnapped : कॅलिफोर्नियात 8 महिन्यांच्या मुलीसह चार भारतीयांचे अपहरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या चार जणांचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरण झालेल्यांमध्ये एक 8 महिन्यांची मुलगी आणि तिच्या पालकांचाही समावेश आहे. मर्सिड काउंटी शेरीफच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 36 वर्षीय जसदीप सिंग, 27 वर्षीय जसलीन कौर, त्यांची 8 महिन्यांची मुलगी आरुही आणि 39 वर्षीय अमनदीप सिंग यांचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयिताचे वर्णन शस्त्रधारी आणि धोकादायक असे केले आहे. (Indian People Kidnapped)

याबाबत पोलिसांकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, दक्षिण महामार्ग 59 च्या 800 ब्लॉकमधून चार जणाना त्यांच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा रोडवेला जोडलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Indian People Kidnapped)

अहवालानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही. त्याचबरोबर ही घटना घडवून आणण्यामागचा हेतू काय आहे हे देखील कळू शकलेले नाही. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास 911 या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन केले आहे. (Indian People Kidnapped)

इयान चक्रीवादळामुळे अमेरिकेत 80 ठार

अमेरिकेतील फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिना राज्यांमध्ये इयान चक्रीवादळाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या तडाख्यामुळे 80 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वादळ गेल्या आठवड्यात नैऋत्य फ्लोरिडाला कॅटेगरी 4 मध्ये धडकले. इयानमुळे फ्लोरिडामध्ये 76 जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर कॅरोलिनामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळामुळे फ्लोरिडामधील ली काउंटीमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला.

Back to top button