चाकण : कांदा, बटाट्याचे भाव तेजीत; हिरवी मिरची व कोबीचे भाव स्थिर | पुढारी

चाकण : कांदा, बटाट्याचे भाव तेजीत; हिरवी मिरची व कोबीचे भाव स्थिर

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा व टोमॅटोचे भाव तेजीत राहिले. हिरवी मिरची व कोबीचे भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात हिरवी मिरची, कोबी व फ्लॉवरची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथीच्या भाजीची भरपूर आवक झाली. शेपू व पालकचे भाव स्थिर राहिले. राजगिरा भाजीच्या दरात मोठी घसरण झाली; तर कोथिंबिरीला उच्चांकी दर मिळाला. एकूण उलाढाल 2 कोटी 90 लाख रुपये झाली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून भावात 200 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1,400 रुपयांवरून 1,600 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 3,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. भावात 200 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,300 रुपयांवरून 2,500 रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून कमाल भावही 4 हजार रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 275 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 20 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :-
कांदा – एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,600 रुपये, भाव क्रमांक 2. 1,300 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 3,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,500 रुपये, भाव क्रमांक 2. 2,000 रुपये, भाव क्रमांक 3. 1,600 रुपये.
फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 230 क्विंटल (1,000 ते 2,500 रु.), कोबी – 190 क्विंटल (1,000 ते 2,000), फ्लॉवर – 180 क्विंटल ( 2,000 ते 3,000), वांगी – 68 क्विंटल ( 4,000 ते 6,000), भेंडी – 53 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 56 क्विंटल ( 4,000 ते 5,000), कारली – 52 क्विंटल (2,500 ते 3,500), दुधी भोपळा – 63 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 71 क्विंटल (1,000 ते 2,000), फरशी – 8 क्विंटल (10,000 ते 12,000), वालवड – 34 क्विंटल ( 4,000 ते 6,000), गवार – 39 क्विंटल (5,000 ते 7,000), ढोबळी मिरची – 118 क्विंटल (1,500 ते 4,500), चवळी – 29 क्विंटल (3,000 ते 4,000), वाटाणा – 125 क्विंटल (5,000 ते 6,000), शेवगा – 12 क्विंटल (7,000 ते 9,000), गाजर – 65 क्विंटल (3,000 ते 4,000).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 8 हजार 950 जुड्या (1,000 ते 2,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 19 हजार 260 जुड्या (1,000 ते 3,000), शेपू – एकूण 3 हजार 540 जुड्या (1,000 ते 1,500), पालक – एकूण 3 हजार 650 जुड्या (1,000 ते 1,500).
जनावरे : चाकणला शेळ्या- मेंढ्यांची भरपूर आवक झाली. विक्रीसाठी आलेल्या 8,470 शेळ्यांपैकी 8,090 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार
रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Back to top button