अंथुर्णे परिसरात बाजरी पीक जोमात | पुढारी

अंथुर्णे परिसरात बाजरी पीक जोमात

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: अंथुर्णे परिसरात बाजरीचे पीक जोमात आले आहे. बागायतीपट्टा असलेल्या या परिसरात ज्वारी, बाजरी व गव्हाचे क्षेत्र अत्यल्प असते. चालू वर्षी या परिसरात खरीप हंगामात बाजरीची लागवड झाली होती. हंगामी पिकांना शेतकर्‍यांना अपेक्षित उतारा मिळाला नाही. मात्र, बाजरीचे पीक जोमदार आले आहे.

मागास हंगामातील बाजरीची वाढ चांगली झाली असून, टपोरे दाण्यांनी कणसे लगडली आहेत. परिणामी, या वर्षी बाजरीचा उतारा चांगला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पक्ष्यांचे थवेचे थवे बाजरी पिकावर अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची पिकाची राखण करता करता दमछाक होत आहे. शेतकर्‍यांनी पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाच्या बाजूने नायलॉन पट्टी बांधल्याचे दिसत येत आहे. तसेच गोफण घेऊन शेतकरी सकाळ-संध्याकाळ पिकांची राखण करीत आहेत.

Back to top button