रेणुका गडावर चौथ्या माळेला उसळला जनसागर | पुढारी

रेणुका गडावर चौथ्या माळेला उसळला जनसागर

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्‍तसेवा : श्री रेणुकामाता मंदिरात चौथ्या माळेला रेणुका भक्तांचा जनसागर उसळला होता. स. ५ वा. पूजारी चंद्रकांत भोपी, चंद्रकांत रिट्ठे यांनी नित्याप्रमाणे ‘श्री’ ला शेंदूर लेपन करून अभिषेक केला. यावेळी विश्वस्त संजय काण्णव, विनायक फांदाडे, अरविंद देव, दुर्गादास भोपी, आशीष जोशी, दुर्गादास भोपी व बालाजी जगत यांची उपस्थिती होती. छबिना काढून परिसर देवता पूजन करून मातेला महाप्रसाद चढविण्यात आला.

मातेच्या दर्शनाला भक्तांनी गेली चार दिवस मोठया प्रमाणात गर्दी केली आहे. तर चौथ्या माळेलाही भाविकांनी प्रचंड गर्दी होती. त्यावर नियंत्रण मिळविताना पोलिस प्रशासन व मंदिर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. यावर्षी मंदिर व्यवस्थापन समितीने दर्शन रांगेत जागोजाग पंखे लावल्याने भाविकांची प्रचंड उकाड्यातून सुटका झाली आहे. तसेच ठिकठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांची गैरसोय दूर झाली.

संस्थानचे वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. एकाच दिवशी सुमारे २२,००० भाविकांनी महाप्रसाद व उपासाच्या उसळीचा लाभ घेतला आहे. महाप्रसाद बनविण्यासाठी आचारी बळीराम मुरगुलवार किनवट यांचे ५० सहकारी दिवसरात्र  मेहनत घेऊन भाविकांसाठी महाप्रसाद बनवला. श्री रेणुकादेवी महाविद्यालय माहूरचे अनेक विद्यार्थी प्रा.डॉ. एस. के. बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनात महाप्रसाद वितरण करण्यासाठी आपली सेवा दिली.

हेही वाचा  

नाशिक : ‘महाश्रामणेर’मध्ये उलगडले बौद्ध जीवन संस्काराचे पाठ

कोल्हापूर : कुर्डू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्य ३० हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद

चंदनापुरीच्या जुन्याघाटात चार लुटारुंनी पुण्याच्या व्यावसायिकाला लुटले

Back to top button