गौतम नवलखांवर जसलोक रुग्णालयात उपचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश | पुढारी

गौतम नवलखांवर जसलोक रुग्णालयात उपचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: भीमा कोरेगाव प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या गौतम नवलखा यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तळोजा तुरुंग प्रशासनास दिले. प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी देण्याऐवजी घरातच बंद ठेवावे, अशा विनंतीची याचिका नवलखा यांनी न्यायालयात दाखल केली आहे.

आरोग्य सुविधा मिळणे हा कैद्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने नवलखा यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार करावेत, असे आदेश तळोजा तुरुंग प्रशासनाला दिले. नवलखा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सबा हुसेन आणि त्यांच्या बहिणीला परवानगी दिली जावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. हाऊस अरेस्ट संदर्भातील नवलखा यांची याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

हेही वाचा

Back to top button