सांगली : मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यावर कारवाई करा : महिला राष्ट्रवादीची मागणी | पुढारी

सांगली : मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यावर कारवाई करा : महिला राष्ट्रवादीची मागणी

विटा; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटातील मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला खोटा फोटो एडिट करून व्हायरल केला. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खानापूर तालुका आणि विटा शहर महिला कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना देण्यात आले.

ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मदतीला शिंदे गटाचे आमदार, नगरसेवक धावले

मुंबईच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो एडिट करून तत्कालीन मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राजेश टोपे यांच्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची वर बसलेल्या आहेत, असे दाखविले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. विटयाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना याबाबतचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शितल म्हात्रे यांनी खोडसाळपणे फोटो व्हायरल करून नागरिकांमध्ये तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला? त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हटले आहे. यावेळी विटा शहराध्यक्ष लता मेटकरी, उपाध्यक्ष डॉ. मुणीसा तांबोळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रेखा पवार, खानापूर तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्ष पूनम महापुरे, सुलोचना शितोळे, मंगल म्हेत्रे, शशिकला भोसले, जयश्री मनगुट्टे, संगीता वैराळ, पार्वती साळुंखे आदी उपस्थित होत्या.

हेही वाचा :

Back to top button