घारगाव- कोठे बुद्रुक रस्त्याची चाळण | पुढारी

घारगाव- कोठे बुद्रुक रस्त्याची चाळण

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील घारगाव ते कोठे बुद्रुक हा डांबरी रस्ता उखडला असून ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या रस्त्याच्या अत्यंत दुरावस्था झाली आहे. तर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम व्हावे म्हणून वारंवार मागणी करूनही या मागणीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव, बोरबन, कोठे बुद्रुक व वनकुटे हा संपूर्ण डांबरी रस्ता दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जात आहे.

या रस्त्यावरून रात्रंदिवस छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात होत असलेल्या पावसाचे डोंगर ओढे नाल्याचे पाणी थेट या रस्त्यावर येत येत असल्यामुळे या रस्त्याचे डांबर निघाले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे.
सध्या या रस्त्यावरून ठिकठिकाणी पाणी वाहत आहे.त्यामुळे रस्त्यावर ठिक-ठिकाणी मोठ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे खासदार, आमदार तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य सुद्धा लक्ष देत नसल्याने त्यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Back to top button