संगमनेर खुर्दमधून पीएफआयस संबंधित मौलानाला पोलिसांनी केली अटक | पुढारी

संगमनेर खुर्दमधून पीएफआयस संबंधित मौलानाला पोलिसांनी केली अटक

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सूचनेवरून पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका मौलानाच्या संगमनेर खुर्दमधील घरावर छापा टाकत त्याला अटक केली आहे. त्याचा पीएफआय या दशतवादी संघटनेशी थेट काही संबंध आहे का? याबाबतची पोलीस कसून चौकशी करत आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी माहितीनुसार, आज मंगळवारी पहाटे दोन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा संगमनेर शहराध्यक्ष असलेल्या मौलाना मोहम्मद खलील दिलावर शेख (वय 38, रा.संगमनेर खुर्द) यांच्या घराची दोन तासांहून अधिक वेळ झाडाझडती घेतली.नंतर त्या मौलनाला ताब्यात घेत पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संगमनेर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी त्या मौलनाची सखोल चौकशीही केली. सध्या त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्याला स्थानबद्ध करण्यासाठीच्या हालचालीही सुरु आहेत.

Back to top button