Urfi Javed : मॅडम, तुम्ही शाई प्यायली आहे का?
पुढारी ऑनलाईन : उर्फी जावेद ( Urfi Javed ) सोशल मीडियावर सक्रिय असते. उर्फी रोज नवीन लुकमध्ये पाहायला मिळते. गेले काही दिवस अभिनेत्री उर्फी जावेद आणि अभिनेत्री चाहत खन्ना यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. या दोघीजणी एकमेकीवर टीका करत आहेत. त्यांनी सभ्यता ओलांडली आहे.
उर्फी तिच्या हॉट फॅशनमुळे ट्रोल होते, पण यावेळी नेटकर्यांच्या निशाण्यावर उर्फीचे कपडे नसून लिपस्टिक आली आहे. पांढर्या रंगाच्या पोशाखात उर्फीने निळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. तिने त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
उर्फीच्या या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले, ‘मॅडम तुम्ही चुकून पेनातली शाई प्यायली आहे का?’ दुसर्याने लिहिले, ‘कोणीतरी विष प्यायले आहे असे दिसते.’ यासोबतच दुसर्याने कमेंट केली की, ‘लिपस्टिक ऐवजी तुम्ही शाई लावली आहे का?’ असे प्रश्न त्यांनी केले.