मुंबई : लिफ्ट सुरू झाली अन् त्यांना खेचत वरती गेली, लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा दुर्देवी अंत | पुढारी

मुंबई : लिफ्ट सुरू झाली अन् त्यांना खेचत वरती गेली, लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा दुर्देवी अंत

मालाड; पुढारी वृत्‍तसेवा : सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या जिनल फर्नांडिस यांचा लिफ्टमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू झाला. काल (शुक्रवार) दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, जिनल फर्नांडिस या दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास वर्गातून शिकवून परतल्या. यानंतर त्‍या दुसऱ्या माळ्यावरुन स्टाफरूममध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये जात असताना त्‍यांनी एक पाय लिफ्टमध्ये ठेवला. या दरम्यान लिफ्ट बंद झाली. त्‍यातच लिफ्ट सुरू झाली अन् त्यांना खेचत वरती गेली. यामध्ये त्‍यांचा मृत्यू झाला.

जिनल या लिफ्ट आणि भिंतीत अडकल्याने त्‍या जखमी झाल्‍या. त्यांनी मदतीसाठी हाक मारली. यावेळी विद्यार्थी व शिक्षक मदतीला पुढे आले. दरम्यान मालाड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी रुग्णवाहिकेतून शिक्षिकेला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्देवाने त्‍यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी अपघाती गुन्हाची नोंद केली असून, लिफ्ट मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीची चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा :  

Back to top button