फायटर प्लेनसारखा दरवाजा असलेली सुपरकार | पुढारी

फायटर प्लेनसारखा दरवाजा असलेली सुपरकार

सिडनी : जगभरातील तरुणाईला स्पोर्टस् बाईक, सुपरकार यांचे आकर्षण असते. आता ऑस्ट्रेलियातील ‘केटीएम’ कंपनीने एक रोड-लीगल सुपरकार लाँच केली आहे. ही कार अतिवेगवान आहे. अनेक विशेष फिचर्स असलेल्या या कारची किंमत जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपये आहे. या कारचा दरवाजा फायटर प्लेनसारखा आहे.

या कारचा लूक अत्यंत आकर्षक आहे. ‘केटीएम’ ही ऑस्ट्रेलियन कंपनी जगभरात खरे तर स्पोर्टस् बाईकसाठी ओळखली जाते; मात्र आता कंपनीने ही ‘एक्स-बो जीटी-एक्सआर’ ही सुपरकार लाँच केली आहे. या सुपरकारचे शंभर युनिटस् बनवले जाणार असून प्रत्येक मॉडेलची किंमत 2,84,700 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.26 कोटी रुपये आहे. या किमतीत टॅक्सचा समावेश नाही. ही सुपरकार शून्य ते ताशी शंभर किलोमीटरचा वेग केवळ 3.4 सेकंदांत आणि ताशी 100 ते 200 किलोमीटरचा वेग केवळ 6.9 सेकंदांत घेऊ शकते. या कारचा कमाल वेग ताशी 280 किलोमीटर इतका आहे.

या कारमध्ये ऑडीचे 2.5 लिटर, 5 सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 500 बीएचपी असून ते 581 एनएम पॉवर जनरेट करते. कूलिंग सिस्टिमसाठी एक मोठा रेडिएटर कारमध्ये लावण्यात आला आहे. उजवीकडे टर्बो इंटरकूलर आहे. यामध्ये 160 लिटरची लगेज स्पेस आणि 95 लिटरचा फ्युएल टँक आहे. या कारला एकच दरवाजा असून तो फायटर प्लेन म्हणजेच लढाऊ विमानांप्रमाणे वरच्या बाजूला हायड्रॉलिक यंत्रणेच्या मदतीने उघडतो.

Back to top button