सेलफोनमध्ये ‘हे’ छिद्र कशासाठी असते? | पुढारी

सेलफोनमध्ये ‘हे’ छिद्र कशासाठी असते?

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंबाबतही पुरेशी माहिती आपल्याला नसते. सेलफोन हा तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे; मात्र या मोबाईल फोनविषयीही आपल्याला बरीचशी माहिती नसतेच. या फोनमधील छोट्याशा छिद्राचे प्रयोजन काय असते हे बहुतांश लोकांना ठावूक नसेल.

आपण आपल्या नवीन फोनला मागून, समोरून, त्याचे सिम स्लॉट, मेमरी स्लॉट, कॅमेरा, इअरफोन जॅक, यूएसबी आणि लाऊडस्पिकरबद्दल पाहत असतो; मात्र या छिद्राची माहिती घेणे आपल्याला जरुरी वाटत नाही. हे लहानसे छिद्र आपल्या फोनसाठी खूपच महत्त्वाचे आहे. हे छिद्र फोनच्या तळाशी, चार्जिंग पोर्टच्या अगदी बाजूला असते.

हे छिद्र म्हणजे ‘नॉइज कॅन्सलिंग मायक्रोफोन’. हा मायक्रोफोन कसा काम करतो हे ठावूक आहे का? ज्यावेळी तुम्ही कुणाला कॉल करता त्यावेळी हा मायक्रोफोन सक्रिय होतो. तो सक्रिय झाल्यावर तुमच्या आवाजास दुसर्‍या बाजूला जाण्यास कोणतीही अडचण येत नाही. तुम्ही तुमचा आवाज दुसर्‍या बाजूला सहज पोहोचवू शकता. इतकेच नव्हे, तर अगदी गोंगाटाच्या ठिकाणीही या छिद्रामुळे मदत होते. अशा वेळी थोडे उंच आवाजात बोलले तरी दुसर्‍या व्यक्तीला आपला आवाज ऐकू येतो.

Back to top button