डोंबिवली: चोरटा जेरबंद, २.२५ लाखांचा ऐवज जप्त | पुढारी

डोंबिवली: चोरटा जेरबंद, २.२५ लाखांचा ऐवज जप्त

डोंबिवली,पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवलीच्या शहर व ग्रामीण भागात सोनसाखळी चोरांनी मागील काही दिवसाध्ये धुमाकूळ घातला आहे. चोरटे दररोज एक ते दोन महिलांना लक्ष करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटत आहेत. या चोरटयांचा पोलिसांकडून शोध सुरू होता, दरम्‍यान टिटवाळ्यात या चोरांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. करण बिरबल राजभर असे या चोरटयाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून 2 लाख 55 हजारांचा ऐवज जप्त केला.

टिटवाळा भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर, बाजारपेठ भागात चोऱ्या वाढल्याने टिटवाळा पोलिसांनी या भागात गस्त वाढविली आहे. टिटवाळा पोलीस सोमवारी सकाळी फळेगाव-वासिंद रस्त्यावरुन दुचाकीवरुन गस्त घालत होते. त्यांना समोरुन सुसाट वेगाने एक तरुण दुचाकीवरुन येत असल्याचे दिसले.

पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. दुचाकीस्वार आपणास पाहून का पळला असा संशय आल्याने गस्तीवरील पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग ताब्‍यात घेतले. त्‍यानंतर तु आम्हाला पाहून का पळालास. तु कुठे चालला आहेस, असे विविध प्रश्न पोलिसांनी करताच दुचाकीस्वार बिथरला.

पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. त्‍यानंतर त्‍याने गुन्हांची कबुली देत आपला एक साथीदारसुदृा आहे असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्‍याच्याकडून 2 लाख 55 हजारांचा ऐवज जप्त केला. करणने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत ? कल्याण-डोंबिवली परिसरातील चोऱ्यांशी त्याचा संबंध आहे का ? तसेच या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button