गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला | पुढारी

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्ह्यात रविवार (दि.११) रोजी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून भामरागड, गडचिरोली आणि धानोरा तालुक्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्ग रात्रीपासून बंद झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील गडचिरोली -गुरवळा, माडेमुल-रनमुल, चांदाळा-कुंभी, धानोरा तालुक्यातील धानोरा-सोडे, पेंढरी-पाखांजूर, साखरा-कारवाफा हे मार्गही पुरामुळे बंद झाल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button