Asia Cup 2022 : पाकिस्तान हारलं अफगाणिस्तान नाचलं! श्रीलंकेने आशिया चषक जिंकल्यानंतर जल्लोष | पुढारी

Asia Cup 2022 : पाकिस्तान हारलं अफगाणिस्तान नाचलं! श्रीलंकेने आशिया चषक जिंकल्यानंतर जल्लोष

पुढारी ऑनलाइन डेस्क : पाकिस्तानला हरवून श्रीलंकेच्या (Asia Cup 2022) आशिया कप 2022 च्या विजयानंतर, अफगाणिस्तानमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला. हा आनंद साजरा करण्यासाठी अफगाणी थेट रस्त्यावर उतरले. काही जणांनी ढोल वाजवले तर काहींनी फटाके… त्याचप्रमाणे अफगाणीस्थानातील अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरही वेगवेगळ्या पद्धतीने श्रीलंकेच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

Asia Cup 2022 आशिया कप 2022 चा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तानात रंगला. यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला नमवत आशिया कप 2022 आपल्या नावे केला. पाकिस्तान हरल्याचा आणि श्रीलंका जिंकल्याचा अफगाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला.

अफगाणिस्तानचे पत्रकार अब्दुलहक ओमेरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, श्रीलंकेच्या विजयानंतर काही जल्लोष करताना, काही आनंदाने नाचताना रस्त्यावर लोकांचा मोठा जमाव दिसत होता. Asia Cup 2022

लोक सोशल मीडियावर श्रीलंकेच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आणि फायनलमधील पाकिस्तानी संघाच्या कामगिरीची, विशेषतः क्षेत्ररक्षण करतानाची झालेल्या दाणादाणचे छायाचित्र शेअर करण्यासाठी देखिल एकत्र आले. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी वेगवेगळे ट्विट करत आला आनंद साजरा केला. पाहा ट्विट…Asia Cup 2022

“आम्हाला खूप आनंदी केल्याबद्दल श्रीलंकेचे अभिनंदन.. अफगाणिस्तान श्रीलंकेच्या विजयाचा आनंद आणि आनंद साजरा करत आहे,” असे एका वापरकर्त्याने ट्विट केले.

आयसीसीच्या पोस्टखालील एका वापरकर्त्याने श्रीलंकेला चॅम्प म्हणून ताज मिळवून दिल्याबद्दल पाकिस्तानची खिल्ली उडवली कारण ते श्रीलंकेला त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत करू शकले नाहीत, तर अफगाणिस्तानने एकदाच केले. “आम्ही आशिया कप चॅम्पियन्सचा पराभव केला पण तुम्ही 2 वेळा हरला,” असे ट्विट युजरने केले आहे.

याच पोस्टखाली, आणखी एका वापरकर्त्याने अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी रस्त्यावर नाचून श्रीलंकेच्या विजयाचा आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. “अशा प्रकारे अफगाणिस्तानचे लोक श्रीलंकेचा विजय साजरा करत आहेत. #AsiaCup2022,” असे ट्विट त्याने केले.

फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या आणखी एका ट्विटर युजरने आनंद व्यक्त केला. ‘पाकिस्तानचा पराभव हा माझा आनंद आहे’, असे ट्विट युजरने म्हटले आहे.

शारजाह येथे बुधवारी आशिया चषक 2022 च्या सुपर फोर टप्प्यातील क्रिकेट सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हे घडले.

आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानने स्वत: देखिल चांगला खेळ केला. ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर ते स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यासाठी पात्र ठरले. परंतु सुपर फोर टप्प्यात त्यांना श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

आशिया चषक स्‍पर्धेवर श्रीलंकेची सहाव्यांदा मोहर, सर्वाधिकवेळा स्‍पर्धा जिंकण्‍याचा बहुमान भारताला

पाकिस्तानला धक्का; वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर

Back to top button