Child Mobile Addiction : तुमची मुलं सतत मोबाईल फोन वापरतात का? तर ‘या’ गोष्टी कराच | पुढारी

Child Mobile Addiction : तुमची मुलं सतत मोबाईल फोन वापरतात का? तर 'या' गोष्टी कराच

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलं जेवत नाही म्हणून त्याला जेवताना मोबाईल देणं, तो त्रास देतोय म्हणून मोबाईल देणं, मोबाईलचं आमिष दाखवून एखादं काम सांगणे, तुम्ही कोणत्यातरी कामात आहात तुमचं मुल त्रास देतेय म्हणून त्याला मोबाईलं देणं असे प्रसंग तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही नक्की पाहत असाल. तसेच एखादं मुलं सतत मोबाईलमध्ये आहे म्हणून त्याला ओरडणे, मोबाईल त्याच्या हातातून काढून घेतल्यानंतर त्याचं रडणं सुरु होणं हे प्रसंग सुद्धा तुम्ही पाहतं असालच. मुलांचे दिवसेंदिवस वाढतं जाणार मोबाईल फोनचा वापरामु‍‍‍ळे (Child Mobile Addiction ) पालक चिंतेत आहेत; पण तुम्ही दररोज काही गोष्टी केल्या तर तुमची मुले मोबाईलच्या मायाजालातून नक्की बाहेर येतील.

कोरोनो काळापासून मुलांमध्ये मोबाईल फोन ‍‍‍वापरणे वाढू लागले आहे. याचा शारिरीक आणि मानसिकतेवर परिणामही होवू लागला आहे. बरेच पालक मुलांच्या या सवयीवर पालक हतबल होताना पाहायला मिळत आहेत. जर का तुम्हाला तुमच्या मुलाला मोबाईल वापराच्या सवयीतून बाहेर काढायचं असेल तर पुढील गोष्टी तुम्ही नक्कीच करा. चला तर मग पाहूया नेमकं काय करायचं आहे ते.

Child Mobile Addiction : मुलांसाठी वेळ द्या

मुलं रडतंय द्या मोबाईल, तुम्हाला त्रास देतयं द्या मोबाईल, तुम्हाला काम करायचं आहे पण मुलं करुन देत नाही द्या मोबाईल या छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या मोबाईल वापराला खुप कारणीभूत ठरत असतात. थोड्यावेळासाठी दिलेला मोबाईल कधी १ तास , २ तास वापरायला लागला हे समजत नाही.त्याचे परिणाम जेव्हा मुलाच्या आरोग्यावर होवू लागले तेव्हा याचे गांभीर्य समजते. मुलांना जर मोबाईल वापराच्या सवयीतून बाहेर काढायचे असेल तर तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करा ती म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्या. मुलांना काय आवडतं, कोणत्या गोष्टी केल्यानंतर तो खुष होतात हे समजुन घ्या. त्या गोष्टी तुम्ही करा, मुलाला त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन द्या. पालकांनी मुलांसाठी वेळ देत त्यांच्याशी संवाद वाढवावा.

मुलाला कामात व्यस्त ठेवा

जर का मुलाचे मोबाईल वापरणे कमी करायचे असेल तर त्याला इतर कामात गुंतवा. त्याला ज्या कामात आनंद वाटतो त्या कामात त्याचा जास्त वेळ द्यायला भाग पाडा. उदा. त्याला खेळायला आवडतं असेल तर खेळायला सांगा. तसं वातावरण निर्माण करा, तुम्ही त्याच्याशी खेळा. जेणेकरुन त्याचे मोबाईल वरील लक्ष कमी होईल.

स्क्रिन टाईम कमी करा

तुमच्या मुलाला मोबाईलची सवय लागली आहे. मोबाईल वापरू नका, एवढे सांगून मोबाईल वापर कमी होण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी. तुम्ही तुमच्या मुलांचा स्क्रिन टाईम कमी करा. एकदम मोबाईलचा वापर बंद करण्यापेक्षा हळूहळू त्याचं मोबाईल वापराचे तास कमी.

तुम्ही तुमचं वर्तन बदला

मुलांनी मोबाईलचा वापर कमी करावा अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही स्वत: मोबाईलचा वापर कमी करा. कारण लहान मुलं ही पालकांचे अनुकर‍‍ण करतात. मुलांच्या वर्तनावर पालकांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत असतो. तुम्ही जर तासान तास मोबाईल वापरत असाल तर याचा परिणाम तुमच्या मुलांवरही होतो. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणा.

हेही वाचा : 

Back to top button