Health : स्‍नायू बळकट असणे का महत्त्वाचे आहे? | पुढारी

Health : स्‍नायू बळकट असणे का महत्त्वाचे आहे?

पुढारी ऑनलाइन डेस्क : स्‍नायू शरीराच्‍या एकूण लीन बॉडी मासचे (म्‍हणजेच एलबीएम) सर्वात मोठे घटक आहेत, जे चरबी व्‍यतिरिक्‍त शरीराच्‍या प्रत्‍येक कार्यामध्‍ये मदत करतात. खरेतर आपल्‍या शरीरामध्‍ये ५० टक्‍के ते ६० टक्‍के वजन स्‍नायूंचे असते. स्‍नायू हालचाल करण्‍यामध्‍ये, तसेच संतुलन राखण्‍यामध्‍ये मदत करतात. शारीरिक शक्‍ती, अवयवांचे कार्य, त्‍वचेची अखंडता, रोगप्रतिकारशक्‍ती आणि जखम बरी होण्‍यासाठी स्‍नायू आरोग्‍यदायी असणे महत्त्वाचे आहे. म्‍हणून आरोग्‍यदायी स्‍नायू तुमचे वय वाढत असताना जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्‍यासाठी आवश्‍यक आहेत.

स्‍नायूंचे आरोग्‍य अनेकदा तुम्‍हाला तुम्‍ही कधी वृद्ध होणार आहात किंवा कशाप्रकारे सक्रिय व स्‍वावलंबी राहाल याबाबत सांगू शकते. म्‍हणून स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम कसे ठेवावे आणि त्‍याचा तुमच्‍या जीवनावर काय परिणाम होतो हे माहित असणे महत्त्वाचे आहे. तुमचे स्‍नायू व स्‍नायूंच्‍या आरोग्‍याबाबत माहित असाव्‍यात अशा काही गोष्‍टी पुढीलप्रमाणे:

वाढत्‍या वयासह स्‍नायूशक्‍ती कमकुवत होते

वयाच्‍या ४०व्‍या वर्षांपासून प्रौढ व्‍यक्‍तींची स्‍नायूशक्‍ती प्रतिदशक जवळपास ८ टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते. वयाच्‍या ७० वर्षांनंतर हे प्रमाण दुप्‍पट होऊ शकते. खरेतर अयोग्‍य पोषण, इतर आजार आणि गंभीर आजारांमुळे स्‍नायूशक्‍ती वेगाने कमकुवत होते. स्‍नायूशक्‍ती कमी झाल्‍याने तुमची ऊर्जा पातळी व हालचालींवर परिणाम होऊ शकतो, खाली पडणे व फ्रॅक्‍चर्सचा धोका वाढू शकतो आणि आजार किंवा शस्‍त्रक्रियेमधून मंद गतीने बरे होण्‍याची शक्‍यता वाढू शकते. स्‍नायू आरोग्‍यदायी असल्‍यास तुम्‍ही सहजपणे हालचाल करू शकता आणि शरीर बळकट ठेवू शकता. स्‍नायू खेळ खेळणे, नृत्‍य, कुत्र्यासोबत चालायला जाणे, पोहणे आणि शारीरिक हालचालीसाठी आवश्‍यक इतर गोष्‍टी अशा तुमच्‍या दैनंदिन कृतींमध्‍ये मदत करतात. तुमचे स्‍नायू बळकट असतील तर सांधे देखील उत्तमप्रकारे कार्य करू शकतील. गुडघ्‍याभोवती असलेले स्‍नायू कमकुवत झाले तर तुमच्‍या गुडघ्‍यांना दुखापती होण्‍याची शक्‍यता असते. आरोग्‍यदायी स्‍नायू तुम्हाला संतुलन राखण्‍यामध्‍ये देखील मदत करतात.

स्‍नायू व रोगप्रतिकारशक्‍ती

तुम्‍हाला तुमच्‍या शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ ठेवायची असेल आणि जीवाणूजन्‍य व संसर्गजन्‍य आजारांचा धोका कमी करायचा असेल तर स्‍नायूंच्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करू नका. स्‍नायूंमधील ऊती रोगप्रतिकार पेशी कार्यान्वित करण्‍यामध्‍ये भूमिका बजावतात. कमकुवत स्‍नायू व रोगप्रतिकारशक्‍ती असलेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये रोगप्रतिकार कार्य कमकुवत असते. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी आपल्‍या आहाराकडे लक्ष द्या आणि तुमच्‍या आहारांमध्‍ये लीन प्रथिने, फळे, पालेभाज्‍या, कडधान्‍ये, नट्स व बीन्‍स आणि कमी मेद असलेल्‍या दुग्‍धजन्‍य पदार्थांचा समावेश करा. एकत्र हे खाद्यपदार्थ कॅल्शियम, जीवनसत्‍व ड, लोह व अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्स यांसारखे सूक्ष्‍म पौष्टिक घटक देतात, जे तुमची रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ करण्‍यास आणि स्‍नायूंचे आरोग्‍य वाढवण्‍यास मदत करू शकतात.

स्‍नायूशक्‍ती कमकुवत होणे व रिकव्‍हरी

तुमचे स्‍नायू तुम्‍ही आजारामधून बरे होत असताना शक्‍ती व ऊर्जेसाठी महत्त्वाचे स्रोत आहेत. तुम्‍ही आजारी किंवा हॉस्पिटलाइज असाल तर तुमच्‍या शरीराला बरे होण्‍यासाठी प्रथिनांसारखे पौष्टिक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, ज्‍यामुळे स्‍नायूंमधील उतींचे नुकसान होते. अशा प्रकारचे स्‍नायूंचे नुकसान आजारातून बरे होण्यास उशीर होणे, जखमा बरे होण्याचे काम मंद होणे आणि जीवनाचा दर्जा कमी होण्याशी संबंधित आहे.

कमकुवत झालेली स्‍नायूशक्‍ती ओळखणे

चांगली बातमी अशी आहे की, हाताच्‍या ग्रिपची शक्‍ती हा स्‍नायूशक्‍तीचे मूल्‍यांकन करण्‍याचा सुलभ मार्ग आहे. संत्र पिळून किंवा तुमच्‍या हँडशेकची दृढता पाहून तुम्‍ही तुमच्‍या स्‍नायूंची शक्‍ती तपासू शकता. तसेच तुमच्‍या स्‍नायूंची शक्‍ती तपासण्‍यासाठी चेअर चॅलेंट टेस्‍ट देखील सुलभ मार्ग आहे. अंदाजे ४३ सेमी (१.४ फूट) उंची असलेल्‍या खुर्चीवर ५ सीट-अप्‍स करण्‍यासाठी लागणारा कालावधी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍नायूंच्‍या शक्‍तीबाबत सांगू शकतो. उदाहरणार्थ, ४० ते ६० वर्षे वयोगटातील व्‍यक्‍ती ही चाचणी करण्‍यासाठी जवळपास ४ ते १३ सेकंद वेळ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आणि ही चाचणी करण्‍यासाठी तुम्‍ही www.muscleagetest.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

स्‍नायू व शक्‍ती पुन्‍हा बळकट करणे

स्‍नायूशक्‍ती कमकुवत होणे नैसर्गिक आहे, पण त्‍यांचा वाढता दर आणि नकारात्‍मक परिणाम नसावेत. आरोग्यदायी जीवनशैली जगण्‍यासाठी आणि तुम्‍ही करणारे दैनंदिन नित्‍यक्रम सुरू ठेवण्‍यासाठी स्‍नायूशक्‍ती कमकुवत होण्‍याची प्रक्रिया मंदावणारे काही सोपे उपाय करू शकता. सर्वात महत्त्वाचा भाग म्‍हणजे स्‍नायूशक्ती पुन्‍हा बळकट करण्‍यासाठी आणि स्‍नायू कमकुवत झाल्‍यामुळे होणा-या संसर्गाच्‍या दीर्घकालीन लक्षणांचे निर्मलून करण्‍यासाठी या उपायांमध्‍ये अधिक उशीर करू नका. हे ताकदीचे व्‍यायाम आणि पुरेसे प्रथिने व पौष्टिक घटकांनी युक्‍त परिपूर्ण, संतुलित आहाराच्‍या संयोजनासह संपादित करता येऊ शकते. पौष्टिक घटकासंदर्भात कॅल्शियम, जीवनसत्‍व ड, जीवनसत्‍व ब१२ व जीवनसत्‍व ब३ हे स्‍नायूंचे आरोग्‍य प्रबळ राखण्‍यासाठी काही प्रमुख पौष्टिक घटक आहेत. स्‍नायूशक्‍तीची नियमितपणे तपसणी करणे देखील आवश्‍यक आहे. तुम्‍ही तुमची लोकोमोटिव्‍ह क्षमता तपासू शकता आणि तुमच्‍या स्‍नायूंची शक्‍ती किती प्रबळ आहे हे जाणून घेऊ शकता. स्‍नायू व शक्‍ती कमकुवत होण्‍याला प्रतिबंध व विलंब करण्‍यास मदत करण्‍यासाठी लवकर काय करता येईल अशा गोष्‍टी लक्षात ठेवा.

स्‍नायू जीवनाच्‍या अनेक पैलूंमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि तुमच्‍या स्‍नायूंची शक्‍ती तपासण्‍यासाठी व सुधारण्‍यासाठी अनेक प्रभावी मार्ग आहेत. स्‍नायू कमकुवत होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी आरोग्‍यदायी पर्यायांसंदर्भात तुमच्‍या डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

लेखक: ॲबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायाच्‍या वैद्यकीय व वैज्ञानिक घडामोडींचे प्रमुख डॉ. इरफान शेख

Back to top button