Asia Cup Pak vs Afg : अफगानिस्तानची झुंज अपयशी; पाकिस्तानचा अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय | पुढारी

Asia Cup Pak vs Afg : अफगानिस्तानची झुंज अपयशी; पाकिस्तानचा अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 फेरीत आज (दि. 7) पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात अफगानिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. शाबाद खान, इफ्तिखार खान यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. बाबर आझम आणि फखर जमान लवकर तंबूत परतल्यानंतर काही काळ इफ्तिखार खान आणि मोहम्मद रिजवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. शेवटच्या षटकात नसीम शाहने  दोन षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगानिस्तानने पाकिस्तानला १३० धावांचे लक्ष्य दिले होते.

पाकिस्तानकडून शाबाद खान २६ चेंडूमध्ये ३६ धावा, इफ्तिखार अहमदने ३० चेंडूमध्ये ३३ तर मोहम्मद रिजवानने २० चेंडूमध्ये २६ धावांची खेळी केली. शाबाद खानने केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने विजय संपादन केला. दरम्यान अफगानिस्तानने पाकिस्तानला कडवी झुंज दिली. अफगानिस्तानकडून फलाहक फारुकी, फरीद मलिकने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर राशिद खानने दोन विकेट्स पटकावल्या.

तत्पूर्वी, हरिस रौफने २ तर मोहम्मद नवाज, नसीम शाह, मोहम्मद हसनैन आणि शाबाद खान यांनी प्रत्येकी १ विकेट्स पटकावत. अफगानिस्तानला १२९ धावापर्यंत रोखले. हरिस रौफने त्याच्या ४ षटकांमध्ये २६ धावा देत दोन विकेट्स पटकावल्या. अटीतटीच्या सामन्यात अफगानिस्तानने पाकिस्तानची भीषण अवस्था केली. शेवटच्या षटकात पाकिस्तानला ११ धावांची गरज होती. पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने अंतिम षटकात २ षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अफगानिस्तानकडून फारिद मलिकने कडवी या गोलंदाजाने कडवी झुंज दिली. त्याने ४ षटकांमध्ये ३१ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या.

Back to top button