IND vs PAK Final : भारत-पाक फायनल शक्य.. असे असेल समीकरण | पुढारी

IND vs PAK Final : भारत-पाक फायनल शक्य.. असे असेल समीकरण

दुबई : वृत्तसंस्था आशिया कपमधील सुपर फोरचे सामने सुरू झाले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी पहिला सामना जिंकला आहे, तर भारत आणि अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या पाक आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, मात्र भारत आणि अफगाणिस्तानलाही उर्वरित दोन सामने जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. सर्व संघांचे दोन सामने बाकी असून आता चारही संघांना विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याची संधी आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाची समीकरणे काय आहेत पाहू. (IND vs PAK Final)

सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतासाठी अजून दोन सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पाकिस्तान संघाने सुपर फोरमधील पहिला सामना जिंकला आहे. पाकिस्तानसाठी अंतिम फेरीचा मार्ग सर्वात सोपा आहे. आता त्याचे दोन्ही सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध आहेत. उरलेले दोन सामने पाकिस्तानने जिंकले तर फायनलमध्ये सहज पोहोचेल. (IND vs PAK Final)

श्रीलंकेच्या संघाने सुपर फोरमधील पहिला सामनाही जिंकला असून उर्वरित दोन सामने जिंकून फायनलमध्ये सहज प्रवेश करू शकतो. पुढील सामन्यात भारताला पराभूत करणे त्यांच्यासाठी खूप कठीण असेल. यानंतर हा संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. श्रीलंकेचा संघ या दोन्हींपैकी एक सामना जिंकू शकला, तर तो अंतिम फेरीत पोहोचू शकतो. (IND vs PAK Final)

संबंधित बातम्या

अफगाणिस्तानला सुपर फोरमधील पहिल्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. या संघाची समीकरणेही पूर्णपणे भारतासारखी आहेत. मात्र भारताच्या तुलनेत अफगाणिस्तानचा संघ कमकुवत आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तानला पुढील दोन सामन्यांमध्ये पराभूत करणे या संघासाठी खूप कठीण असेल. (IND vs PAK Final)

हेही वाचलंत का?

Back to top button