औरंगाबाद : दहा हजाराची लाच घेताना वजनमापे निरीक्षकास रंगेहात पकडले | पुढारी

औरंगाबाद : दहा हजाराची लाच घेताना वजनमापे निरीक्षकास रंगेहात पकडले

कन्नड, (औरंगाबाद) पुढारी वृत्तसेवा : शहरातील वजनमापे कार्यालयातील निरीक्षकास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान या प्रकरणी वजनमापे कार्यालयातील निरीक्षकास आज (दि. ५) ताब्यात घेण्यात आले आहे. ज्ञानेश्वर किसनराव तांदळे (वय ४९ कार्यालय, कन्नड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.

शहरातील एका गॅस एजन्सी मधील इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्याचा डिस्प्ले वजनमापे निरीक्षकाने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतला होता. तो सोडविण्यासाठी तक्रारदारकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधीत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

यामुळे वजन मापे निरीक्षक ज्ञानेश्वर किसनराव तांदळे (वय ४९ कार्यालय, कन्नड) यास दहा हजाराची लाच घेताना ला.प्र. वि. चे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस अंमलदार चंद्रकांत शिंदे यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. सदर आरोपीची अटक व गुन्हा नोंद करण्याची प्रकिया शहर पोलीस ठाण्यात सुरू असून त्या नंतर त्यास औरंगाबाद येथील लाच प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात नेण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button