गणपती आगमन मिरवणूकवेळी पोलिसांच्या सर्तकतेमूळे दुर्घटना टळली | पुढारी

गणपती आगमन मिरवणूकवेळी पोलिसांच्या सर्तकतेमूळे दुर्घटना टळली

सातारा : पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यात रविवारी रात्री गणपती आगमन मिरवणूक वेळी मोती चौक येथे एका गणपतीच्या पाठीमागे असेल्या डेकोरेशनला अचानक आग लागली. यावेळी वाहतूक अंमलदार पोलिस योगेश जाधव यांनी प्रंसगवधान राखून गणपती देखाव्यावर चढून आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला असून घटनेवेळी थरार निर्माण झाला.

गणपती आगमन मिरवणूक सुरू असताना परिसरात गर्दी होती. यावेळी डेकोरेशन केलेल्या काही भागाला अचानक आग लागली. आग व धूर येताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने मात्र तात्काळ हालचाल करून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. उपस्थितानी वाहतूक अंमलदार याचे आभार मानून कैतुक केले. दरम्यान, ही घटना वगळता आगमन मिरवणूका रात्री ९.४५ वाजता शांततेत पार पडल्या आहेत.

Back to top button