Sunny Leone : गुलाबी😍; बेबी पिंक शार्ट वनपीसमधील सनीचा सोशल मीडियात धुमाकूळ | पुढारी

Sunny Leone : गुलाबी😍; बेबी पिंक शार्ट वनपीसमधील सनीचा सोशल मीडियात धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क :   बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) चित्रपटांत अधिक दिसून येत नसली तरी तिचे फॅन फॉलोइंग कोणत्याही फिल्मस्टारपेक्षा कमी नाहीत. सनी लियोनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी आपल्या सौंदर्याचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या सनीने एका बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमधील फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) तिच्या इन्स्टाग्रामवर बेबी पिंक रंगाच्या शार्ट वनपीसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने ‘Pink pink pink!!’. अशी हटके कॅप्शन दिली आहे. मोकळे केस, न्यूड मेकअप आणि पिंक लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोत सनी खूपच ग्लॅमरस दिसतेय. यात कधी सनीने तिच्या कमरेवर हात ठेवत तर कधी पुढे झुकत हटके पोझ दिली आहे.

सनीचे हे फोटो हॉलमध्ये क्लिक केले असावेत कारण फोटोत सोफा, खुर्चा, फॅन, टेबल लॅम्प आणि इतर अनेक वस्तू दिसत आहेत. याच दरम्यान सनीने आणखी एका ब्लॅक रंगाच्या आउटफिटमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ब्लॅक रंगाचा हार्ट ईमोजी आणि फायरचा ईमोजी दिला आहे. हे फोटो चाहच्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ‘Dammmmmn😜’, ‘Wow 😳’, ‘Wow look like so very Gorgeous😘’, ‘stunning’, ‘Gorgeouspost🌺’, ‘Awmsm, good’, ‘so very Gorgeous😘’, ‘गुलाबी😍’, ‘So sweet 🔥’, ‘Osm 🔥Super amazing 😍🔥’,’ Awsmm❤️’. यासारख्या अनेक  कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे. सनी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.  सनी भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या ‘पट्टा’ चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button