Sonam Kapoor : सोनमने ३७ व्या वर्षी आई! पोटात-मांडीत घेतले इंजेक्शन | पुढारी

Sonam Kapoor : सोनमने ३७ व्या वर्षी आई! पोटात-मांडीत घेतले इंजेक्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) वयाच्या ३७ व्या वर्षी आई झाली. २० ऑगस्ट रोजी तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. सोनम आई झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून देण्यात आली. तिला प्रेग्नेंसी काळात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला. हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. सोनम कपूरने तिचा पहिला त्रैमासिक काळ कसा होता आणि तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितले. यासोबतच त्याने आपल्या प्रेग्नन्सीची माहिती कोणत्या परिस्थितीत समजली हेदेखील सांगितले. (Sonam Kapoor)

सोनम कपूरने मुलाच्या जन्मापूर्वी वोग इंडियासोबत फोटोशूट केले होते. मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, तिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर कळले. यानंतर तिने पती आनंद आहुजा यांना झूम कॉलवर याबाबत सांगितले. सोनम म्हणते, ‘मला ख्रिसमसच्या दिवशी कळले की मी प्रेग्नंट आहे. आनंद आमच्या लंडन अपार्टमेंटच्या दुसर्‍या खोलीत होता कारण त्याला कोविड झाला होता. म्हणून मी त्याला झूम फोन करून ही बातमी दिली. त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना फोन करून सांगितले.

सोनम म्हणाली- जेव्हा एखादी महिला वयाच्या ३१ किंवा ३२ व्या वर्षांनंतर प्रेग्नेंट झाल्यानंतर लोक याकाळात हे करायचं नाही…ते करायचं नाही…हे खायचं नाही…ते खायचं नाही…असे सांगतात. तिने सांगितले की, ती प्रेग्नेंट असताना पहिल्या तिमाहीत लंडनमधील अनेक लोकांना कोरोनाचा त्रास झाला होता. त्या कठीण काळाची आठवण करून देत सोनम म्हणाली, तिलाही ताप आला होता. यानंतर तिने गुगल केले की ‘तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला कोविड-१९ झाला तर काय करावे?’

पहिले तीन महिने अडचणींचे

ती म्हणाली, ‘आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की मी जास्त काळजी घेईन. कारण त्यावेळी लंडनमध्ये अनेकांना कोरोना झाला होता. पण बरोबर एक महिन्यानंतर मला ताप, खोकला आणि सर्दीही झाली. मी खूप घाबरले आणि मी पटकन विचारले ‘तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला COVID-१९ झाला तर काय होईल?’ गुगल सर्च सुरू केले. ते खूप कठीण होते. मी माझ्या मांड्या आणि पोटात प्रोजेस्टेरॉनचे शॉट्स घेत होते, प्रत्यक्षात माझ्या शरीरात सर्वत्र. कारण मी ॲडवान्स मॅटरनल एजची होते. मला सतत उलट्या होत होत्या. मी सतत आजारी पडले.

ती पुढे म्हणाली, ‘३१ किंवा ३२ वर्षांची महिला जेव्हा गर्भवती होते, तेव्हा प्रत्येकजण खूप अस्वस्थ होतो. ते तुम्हाला सांगतात की हे करू नका, असे करू नका, गर्भधारणेचा मधुमेह किंवा प्री-एक्लॅम्पसियाला बळी पडू नका. मी म्हणाले, थांबा मला अजून खूप यंग वाटते आहे. माझ्या आत माझ्या वडिलांचे जीन्स आहेत. माझे वडील अजून यंग दिसतात. मीही तरुण दिसते सगळं व्यवस्थित होईल.’

सोनम कपूर आणि आनंद आहुजा लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. मे २०१८ मध्ये दोघांनी मुंबईत लग्नगाठ बांधली. सोनम कपूरने मार्च २०२२ मध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने आनंद आहुजासोबत मॅटर्निटी फोटोशूट केले, जे खूप व्हायरल झाले होते. सोनम आणि आनंद यांच्या मुलाचा जन्म २० ऑगस्ट, २०२२ रोजी झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

Back to top button