पुढारी ऑनलाईन डेस्क : ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात डेब्यू करणारी फॅशन डिझायनर नॅन्सी त्यागीने आपल्या जीवनाविषयी काही गोष्टी शेअर केल्या. २३ वर्षांची फॅशन इन्फ्लुएंसर नॅन्सी त्यागीने 'कान्स २०२४' च्या रेड कार्पेटवर सेल्फ-स्टिच्ड पिंक गाउन परिधान करून वॉक केला. तिने आपल्या कान्सच्या आऊटफिटविषयी देखील सांगितले आणि आपल्या व्हायरल डान्सबद्दल सांगितले. तिला माहिती होतं की, ती आपला ड्रेस जितका मोठा बनवेल, तितकं कान्स रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधलं जाईल. यावेळी तिने आपल्या आईच्या कष्टाविषयीदेखील सांगितले.
नॅन्सी त्यागीने एका पॉडकास्टवर बोलताना सांगितले की, तिला आपल्या आईची फॅक्टरीमधील नोकरी बंद करायची होती. नॅन्सी म्हणाली की, तिला खूप सारा पैसा कमवायचा नव्हता. फक्त एक रक्कम हवी होती. जेणेकरून तिची आई कामावर जाणे बंद करेल आणि घरी बसून आराम करेल. ती म्हणाली, "मला पैसा नको होता, फक्त मला माझ्या आईला तिच्या कामापासून दूर ठेवायचंय होतं."
अधिक वाचा –
नॅन्सीला आपले स्वप्न, आपले शिक्षण पूर्ण करायचे हते. त्याचवेळी कोरोना आला आणि स्वप्ने ही स्वप्नेच राहिली. तिची आई फॅक्टरीमध्ये कामाला जाऊ लागली. पण, आईने या फॅक्टरीतील काम बंद करावं, असं नॅन्सीला वाटायचं. यावेळी बोलताना तिला रडूदेखील कोसळलं. ती म्हणाली, माझे स्वप्न साईडलाईन झाले होते. माझ्या कानावर यायचं की, आज कुणाचा तरी हात मशीनमध्ये सापडला आहे. मला खूप चिंता वाटायची, हा प्रकार आमच्यासोबत होऊ नये…मला भीती वाटायची…आता आई खुश आहे, ती आरामात आहे.
अधिक वाचा –