भीमाशंकर : हर हर महादेवचा गजर; लाखो भाविकांकडून भीमाशंकरचे दर्शन
भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग समजल्या जाणार्या श्री क्षेत्र भीमाशंकरचे दुसर्या श्रावणी सोमवारी तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’, ‘हर हर महादेव’च्या घोषणेने परिसर दुमदुमला होता. मुखदर्शनाचीही सोय उपलब्ध असल्याने दर्शन सुलभ झाले.
अधूनमधून येणार्या श्रावणसरी, दाट धुके, बोचरी थंडी असे वातावरण परिसरात होते. कोकणातून शिडीघाट व बैलघाट खांडसमार्गे अनेक भाविक पायी येत होते. भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनरांग दीड किमीपर्यंत गेली होती. यंदा दोन्ही सोमवारी अभिषेक सुरू असल्याने भाविकांना दर्शनासाठी वेळ लागत होता. एमटीडीसी ते मंदिर अशी दीड किमीची रांग असताना गोरक्ष मठाच्या बाजूने दुुसरी दर्शनरांग तयार होत होती.