दिल्लीत हाय अलर्ट : स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याची ‘आयबी’ने व्‍यक्‍त केली शक्‍यता | पुढारी

दिल्लीत हाय अलर्ट : स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याची 'आयबी'ने व्‍यक्‍त केली शक्‍यता

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
भारत यंदा स्वातंत्राचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. पंरतु, देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्ली आणि जम्मू-काश्मीर मध्ये ‘लष्कर-ए-खालसा’ कडून घातपात घडवून आणण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) कडून यासंबंधी अर्लट जारी करण्यात आला आहे. भारतात दहशवादी कारवाया करण्यासाठी लष्कर-ए-खालसा ची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘आयबी’कडून अहवाल सादर

आयबी कडून यासंबंधी दहा पानी अहवाल सादर करण्यात आला आहे. राजस्थानमधील उदयपूर तसेच महाराष्ट्रातील अमरावती मधील घटनेचा उल्लेख करीत कट्टरवादी संघटनांकडून दंगली घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात अशाप्रकारच्या कट्टरवादी संघटनांसंबंधी अंदाज घेण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणाकडून देण्यात आल्या आहेत.

दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ

अलर्टनंतर राजधानी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. इंडिया गेट सह अतिमहत्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान असलेल्या ठिकाणांवरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅरिकेडिंग करीत पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button