Asia Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी आहेत टीम इंडियाचे सामने | पुढारी

Asia Cup 2022 चे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी आहेत टीम इंडियाचे सामने

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 2022 चे (Asia Cup 2022) संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी याची घोषणा केली. या महिन्याच्या अखेरीस सुरू या स्पर्धेचे बिगुल वाजणार असून टी-20 फॉरमॅटमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना रविवारी 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटवरून माहिती दिली. ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘प्रतीक्षा अखेर संपली आहे. आशियाई वर्चस्वाची लढाई 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. हा 15 वा आशिया कप आहे. आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळवली जाणारी ही स्पर्धा आदर्श तयारीसाठी उत्तम आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत.’ (Asia Cup 2022)

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यासह एक संघ पात्रता फेरच्या माध्यमातून आशिया कप 2022 मध्ये सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केले आहे, परंतु ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल. एसीसीने या स्पर्धेसाठी दुबई आणि शारजाह शहरांची निवड केली आहे. या ठिकाणी अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने 16 दिवसात खेळवले जाणार आहेत. (Asia Cup 2022)

भारतीय संघाच्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, 28 ऑगस्ट रोजी पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होईल. हा महामुकाबला दुबई येथील मैदानावर खेळवला जाईल. तर भारताचा दुसरा सामना क्वालिफायर संघाशी होईल. हा सामना 31 ऑगस्ट रोजी दुबईतच होणार आहे. भारताला गट फेरीत फक्त दोन सामने खेळायचे आहेत. भारताच्या गटात पाकिस्तान आणि पात्रता फेरीतून क्वालीफाय झालेला संघ असेल. तर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका दुसऱ्या गटात आहेत. (Asia Cup 2022)

Back to top button